भारतात होळी हा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. या सणाची वेगवेगळी परंपरा आहे.

12 March 2025

होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जातो. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण असते.

होळीला सर्व एकमेकांना रंग लावतात. वेगवेगळ्या रंगांची धूम होळीला देशभर असते.

होळी हा रंगांचा उत्सव आहे. शेकडो वर्षांपासून हा सण समाजातील सर्व जाती, वर्ग, वय आणि पिढ्यांना एकत्र आणतो.

भारतात एक ठिकाणी होळीची वेगळीच परंपरा आहे. या ठिकाणी कोणत्या पुरुषाने कुमारी मुलीला रंग लावला तर त्याला त्या मुलीशी लग्न करावे लागते.

मुलीने जर त्या तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला, तर त्या गुन्ह्यासाठी, त्या मुलाची सर्व मालमत्ता जप्त केली जाते. ती संपत्ती त्या मुलीच्या नावावर केली जाते.

होळीची ही अनोखी परंपरा झारखंडमधील पश्चिम सिंहभूमपासून पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीपर्यंत अनेक भागांत  आहे.