नासा स्पेस मिशनसाठी अंतराळवीरांची निवड कशी होते?

13 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

अमेरिकन अंतराळ संस्था नासा अनेक मोहिमा राबवत असते. नासाच्या अधिकृत वेबसाईटनुसार, अंतराळ संस्थेकडे एकूण 48 अंतराळवीर आहेत. 

अधिकृत वेबसाईटनुसार, 1959 पासून नासाने अंतराळ मोहिमेसाठी एकूण 360 अंतराळवीरांची भरती केली आहे. 

नासा अंतराळवीरांच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाइटवर माहिती प्रदान करते. तसेच थेट अर्ज करण्याची संधी मिळते.

नासामध्ये सामील होण्यासाठी अमेरिकन नागरिक असणं अनिवार्य आहे. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तसेच 2 वर्षांचा व्यावसायिक अनुभवही गरजेचा आहे. 

नासा भरतीचा भाग होण्यासाठी शारीरिक, आरोग्यासोबतच डोळ्यांची तपासणी केली जाते.

सर्व निकष पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला मुलाखत, मानसशास्त्रीय चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि ग्रुप एक्सरसाईजसाठी बोलवलं जातं. या चाचण्या पास होणं आवश्यक आहे. 

नासा एकूण 10 ते 15 अंतराळवीर उमेदवारींची निवड करते. त्यांना 2 वर्षांच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जाते. यात यशस्वी झालेल्या उमेदवारांना अंतराळवीर म्हणून निवडले जाते. 

उपाशी पोटी कडुलिंबाची पानं खाल्ल्याने कोणते आजार नियंत्रणात राहतात?