9 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
भारतात हापुस, केसर, दहशरी आंब्यासह अनेक जाती आहेत. पण लंगडा आंबा हे नाव लक्ष वेधून घेतं.
काही रिपोर्टनुसार, लंगडा आंब्यांचं थेट नातं उत्तर प्रदेशच्या वारणासी शहराशी आहे. येथेच या आंब्याला नाव मिळालं.
एका दाव्यानुसार, वाराणसीत एक दिव्यांग व्यक्ती राहात होता. त्याच्या अंगणात हे आंब्याचं झाड होतं.
त्या व्यक्तीच्या अंगणात असलेल्या आंब्याचा स्वाद आणि सुवास खूपच वेगळा होता. लोकांनी याची चव घेतली आणि तेथून हे नाव पडल्याचं बोललं जातं.
लंगडा आंब्याची कोणतंच वैज्ञानिक नातं नाही. लंगडा आंब्याचं साल पातळ आणि हिरवं असतं.
लंगडा आंबा तंतूमय नाही. पण नरम आणि गोड असतो. याला खूपच छान सुवास येतो.
लंगडा आंबा उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात येतो.