31 october 2025
Created By: Atul Kamble
हिवाळ्यात शरीरास आतून गरम करणारा आहार असावा. तसेच त्यात पोषकतत्वेही असावीत त्यामुळे इम्युनिटी देखील वाढते
बदाम हिवाळ्यात खावेत. कारण यात अनेक पोषक घटक असतात. बदाम उष्ण असल्याने सर्दी आणि खोकला होत नाही.
हेल्थ लाईनच्या मते २८ ग्रॅम बदामात ३.५ ग्रॅम फायबर,६ ग्रॅम प्लांट बेस्ट प्रोटीन, १४ ग्रॅम मोनोसॅच्युरेटेड फॅट, रोजच्या गरजेच्या ४८ टक्के विटामिन ई, २७ टक्के मॅगनीज, १८ टक्के मॅग्ननेशियम असते. तसेच कॉपर, बी२ सारखे पोषक तत्वे असतात.
डाएटमध्ये वय, जेंडर आणि शरीराच्या गरजेनुसार समावेश करावा.एक्सपर्ट नमामी अग्रवाल यांच्या मते डेली रुटीनमध्ये एक स्वस्थ वयस्क व्यक्ती ५ ते १० बदाम खाऊ शकतो.
रात्रभर पाण्यात बदाम भिजवावे आणि सकाळी उपाशी पोठी साली काढून खावावेत. त्यामुळे दीर्घकाळ एनर्जी मिळते. ज्यामुळे दिवसभर एक्टीव्ह राहाता येते.
बदाम दूधात उकळून देखील घेऊ शकता. त्यामुळे कॅल्शियम आणि विटामिन डी देखील मिळते. तसेच प्रोटीन इंटेक वाढतो.
बदाम खाल्ल्याने शरीर गरम रहाते. इम्युनिटी वाढते. यात ई विटामिन असल्याने त्वचा देखील चांगले रहाते. बदामात अनेक फायदे असतात.