पंतप्रधान नरेंद्र मोदी रिलायन्स समूहाचे संचालक अनंत अंबानी यांच्या वनतारा वन्यजीव बचाव केंद्रात गेले.
5 March 2025
मोदी यांच्या वनताराच्या दौऱ्यात स्वत: अनंत अंबानी त्यांच्यासोबत होते. त्या ठिकाणी मोदी प्राण्यांच्या पिल्लांना दूध पाजतानाचे फोटो समोर आले आ
हे.
वनतार जखमी, संकटग्रस्त आणि नामशेष होणाऱ्या प्राण्यांचे ठिकाण आहे. ते गुजरातमधील जामनगरमध्ये आहे. तीन हजार एकर क्षेत्रावर त्याचा विस्तार झाला आहे.
वनताऱ्यात हजारो प्राणी आहेत. त्यात हत्ती, हरीण आणि जग्वार यासह विविध प्रकारचे प्राणी आहेत. एकूण किती प्राणी आहेत ते जाणून घ्या.
वनतारामध्ये सुमारे 200 हत्ती आहेत. याशिवाय जवळपास 300 सिंह, चित्ता, वाघ आणि बिबटे आहेत. याशिवाय तृणभक्षी प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत.
वनतारामध्ये 3 हजार तृणभक्षी प्राणी आहेत. यामध्ये हरणांचाही समावेश आहे. याशिवाय सरपटणारे प्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत.
वनतारामध्ये 1200 सरपटणारे प्राणी आहेत. त्यात मगर, कासव, साप यासह इतर प्राण्यांचा समावेश आहे.
3 हजार एकरांवर पसरलेले वनतारा हे विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठीही ओळखले जाते. त्याचे अनेक फोटोही व्हायरल झाले आहेत.
हे ही वाचा... बॉलीवूड एक्ट्रेसेस नाही या 'ब्यूटी विद ब्रेन्स', देशातील सुंदर IAS-IPS