Created By: Atul Kamble

22 April 2026

पाकिस्तानात 1 लाख रुपये महिना कमावणारे लोक किती ? धक्कादायक आकडेवारी...

Created By: Atul Kamble

 1 भारतीय रुपया = 3 पाकिस्तानी रुपया अशी स्थिती आहे. पाकिस्तानात 3 लाख PKR मासिक उत्पन्न, भारतात 1 लाख INR मासिक उत्पन्नाच्या बरोबर आहे.

पाकिस्तानची लोकसंख्या 25 कोटी इतकी आहे. यातील खूप कमी लोक हाय-इनकम कॅटगरीत येतात.

फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूनुसार ऑक्टोबर 2025 पर्यंत पाकिस्तानात सुमारे 59 लाख लोक रजिस्टर करदाते आहेत. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे.

विविध अंदाजानुसार केवळ 4 ते 10 लाख लोकच 3 लाख पाकिस्तानी रुपये वा त्याहून अधिक कमाई करतात.( म्हणजे भारतीय रुपयात 1 लाख रुपये )

3 लाख रुपये म्हणजे 1 लाख भारतीय रुपये कमवणारा वर्ग पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येच्या 0.2 ते 0.4 टक्केच म्हणजे खूप कमी आहे.

 खरी संख्या थोडी जास्तही असू शकते. परंतू व्यापारी आणि जमीनदारात उत्पन्न लपवण्याची प्रवृत्ती सामान्य आहे.पाकिस्तानचे टॉपचे 1 टक्के लोकच एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा 24 टक्के हिस्सा कमवतात.

पाकिस्तानच्या खालच्या 50 टक्के लोकांना केवळ 15 टक्के उत्पन्न मिळते.जे जास्त आर्थिक असमानता दर्शवते.पाकिस्तानात मासिक सरासरी उत्पन्न सुमारे 39,000 PKR आहे. 3 लाख कमावणारे व्यक्ती सरासरी कर्मचाऱ्यांपेक्षा सुमारे 8 पट जास्त कमावतात.