दातांवर काही वेळाने प्लाक म्हणजे एक चिकट थर जमू लागतो.ज्यात बॅक्टेरिया असतात. त्याने दात किडू शकतात. त्यामुळे रोज ब्रश केल्याने दुर्गंधी, कॅव्हीटी, पायरियासारखे आजार होत नाहीत
डॉ.प्रवेश मेहरा यांच्या मते सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे गरजेचे असते. जेवल्यानंतर चुळ भरल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि दांत स्वच्छ राहतात
दोन मिनिटं ब्रश करणे पुरेसे असते. दर ३० सेकंदाला प्रत्येक कोपरा साफ करावा,वरची उजवी, वरची डावी आणि खालची उजवी, खालची डावी बाजू स्वच्छ करावी
हलक्या हाताने ब्रश गोलाकार दिशेने फिरवत दास स्वच्छ करावे,जास्त जोराने घासल्याने दातांच्या वरच्या आवरणाला धक्का पोहचून नुकसान होऊ शकते
सॉफ्ट ब्रिसलवाल्या टुथब्रशचा वापर करा,हा ब्रश हिरड्यांवर जास्त दबाव टाकत नाही.इलेक्ट्रीक ब्रशचा देखील वापर करु शकता
दातांना ब्रश करण्याशिवाय फ्लॉसिंग - माऊथवॉश देखील करावा,जीभेची स्वच्छता करणे गरजेचे असते. त्यामुळे बॅक्टेरियांना वाव मिळत नाही.
दांत आणि हिरड्यांचे आरोग्य राखण्यासाठी गोड आणि जास्त एसिडीक फूडपासून दूर राहा, कॅल्शियम-विटामिन्स डी असलेले पदार्थ खाल्ल्याने दात मजबूत होतात.