पावसाच्या पाण्याबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. पावसाचे पाणी स्वच्छ दिसते. त्यामुळे ते पिण्यासाठी योग्य असते, असा समज आहे. 

6 July 2025

पाणी बाष्पीभवनाच्या प्रक्रियेद्वारे ढगांपर्यंत पोहोचते. त्यानंतर ते पुन्हा पावसाच्या माध्यमातून जमीनीपर्यंत पोहोचेपर्यंत शुद्ध असते.

डिस्टिल्ड वॉटरला स्वच्छ पाणी म्हटले जाते. त्यातील अशुद्ध घटक काढले जातात. कारण ते वॉफ बनवून तयार केले जाते.

डिस्टिल्ड वॉटरचा हा फंडा पावसासाठी लागू आहे का? कारण पाण्याची वाफ ढगात रूपांतरित होते. त्यामुळे ढगातून पडणारे पाणी स्वच्छ असते, असा काहींचा समज आहे.

प्रत्यक्षात डिस्‍ट‍िल्‍ड वॉटर खुल्या जागेवर तयार केले जात नाही. त्यामुळे ते सुरक्षित असते. पावसाचे पाणी जेव्हा जमिनीवर येते तेव्हा पर्यावरणातील अनेक अशुद्ध घटक त्यात मिक्स होतात.

पाणी जमिनीवर पडते तेव्हा त्यात धूळ, माती, SO₂-NOx सारखा गॅस, कीटाणू मिक्स होतात. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असते.

पावसाचे पाणी स्वच्छ दिसते, त्या आधारावर ते पिण्यासाठी योग्य नाही. तपासणीनंतरच ते किती अशुद्ध आहे, हे समजणार आहे. 

पहिल्या पावसाच्या पाण्याने आंघोळ करु नये, असा सल्ला दिला जातो. कारण पहिल्या पावसात वातावरणातील घाण, प्रदूषण यांचे कण पाण्यातून शरीरावर पडतात. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.