5 september 2025
Created By: Atul Kamble
जरासे चालल्याने जर दम लागत असेल तर जोराने श्वास घ्यावा लागत असेल तर ही सामान्य गोष्ट नाही
धाप लागणे अनेक समस्यांचे कारण असू शकते. हृदय,फुप्फुसे, रक्ता संदर्भातील आजार असू शकतात
हिमोग्लोबिनची पातळी कमी असेल तर सर्व अवयवांपर्यंत ऑक्सीजन पोहचत नाही.त्यामुळे थोडेसे चालल्याने थकवा येऊ शकतो
एनीमियात म्हणजे रक्ताची कमरता हा आजार स्रीयांना अधिक असतो.महिलांना पिरियड्स वा प्रेग्नंसीत अशी समस्या असते
अस्थमा, क्रॉनिक ऑब्सट्रक्टीव्ह पल्मोनरी डिसीज( COPD),फुप्फुसाचे इन्फेक्शन वा फायब्रोसिस सारखे रोग फुप्फुसाची कार्यक्षमता प्रभावित करु शकते
फुप्फुसे शरीरात पर्याप्त ऑक्सीजन पोहचवत नाहीत,तेव्हा दम लागू शकतो
हायपरथायरॉईडिझममध्ये मेटाबॉलिझम वेगाने होते.त्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात.त्यामुळे शरीर लवकर थकते.त्यामुळे दम लागतो.
जास्त वजन झाल्याने छोट्या हालचालीने जास्त मेहनत करावी लागते. हृदय आणि फुप्फुसांवर दाब वाढून लवकर दम लागतो
शरीरात पाणी कमी असल्याने इलेक्ट्रोलाईट्स असंतुलनामुळे देखील थकवा आणि धाप लागते.
( डिस्क्लेमर - हा लेख केवळ सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )