पिंपल्सपासून सुटका हवी तर तुरटीचा असा वापर करा
10 July 2025
Created By: Atul Kamble
तुरटी जंतूनाशक असल्याने तुरटीचा वापर करुन मुरुम आणि पुटकुळ्या दूर होण्यास मदत होते
जर तुम्हाला वारंवार पिंपल्स येत असेल तर तुरटीची पावडर बनवून त्यात पाणी टाकून पेस्ट बनवा
ही तुरटी पेस्ट पिंपल्सवर १० ते १५ मिनिटे लावा नंतर थंड पाण्याने तोंड धुवावे
रोज दिवसातून एकदा असे केल्याने पिंपल्स आणि हळूहळू डागही गायब होतील
तुरटीचा वापर कोणत्याही स्कीनसाठी करता येतो
वारंवार पिंपल्सचा त्रास असेल वा ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी तुरटी रामबाण उपाय आहे.
तुरटीत एस्ट्रीजेंट प्रॉपर्टीज असल्याने ती स्कीनला ड्राय करीत असते.
जर तुमची स्कीन खूपच ड्राय असेल तर मात्र तुरटी वापरु नये
तसेच ज्या लोकांना एक्झिमा वा सोरायसिस आहे वा ज्यांची स्कीन नाजूक आहे.त्यांनी तुरटी अजिबात वापरु नये
आचार्य चाणक्य - असे लोक नेहमी गरीबच राहतात