आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यक्ती विविध गोष्टींचा आहारात समावेश करतो.
28 Feb 2025
आरोग्यासाठी सर्वोत्तम असणाऱ्या छोटे ड्रॉयफ्रूट म्हणजेच मखानेवर भारतासह अनेक देश अवलंबून आहे.
भारतातील मखान्यांची मागणी अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडपर्यंत आहे.
भारतातून मखाना निर्यात अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि यूएई यासह अनेक देशांमध्ये होतो.
जगात सर्वाधिक मखान्यांचे उत्पादन भारतात होते. जगातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत 90% मखाने भारतात त्यातच बिहारमध्ये होतात.
बिहारमधील नऊ जिल्ह्यात मखान्यांचे उत्पादन सर्वाधिक होते. त्यात दरभंगा, अररिया, किशनगंज, कटिहार, सीतामढी, सहरसा, पूर्णिया, सपंत आणि मधुबनी जिल्ह्याचा समावेश आहे.
बिहारसह मखाने भारतातील पश्चिम बंगाल, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान यासारख्या राज्यात होतात.
भारतासोबत रशिया, कोरिया आणि जपानमधील काही भागात मखान्यांची शेती केली जाते.
मखाने आरोग्यासाठी चांगले असतात. शाकाहारी लोकांसाठी ते प्रोटीन मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे. त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.