Kidney Health: औषधाविनाच गळेल किडनी स्टोन, रोज प्या हे 3 ड्रिंक्स

28 september 2025

Created By: Atul Kamble

 किडनी शरीराचा महत्वाचा अवयव आहे.टॉक्सिंस शरीराबाहेर काढण्यासाठी ती मदत करते.त्यामुळे शरीर निरोगी राहते

अनेकदा आपल्या चुकीच्या आहाराने किडनीवर प्रचंड ताण येत असतो

 किडनीसाठी अनहेल्दी फॅट्स, कार्ब्स, साखर,मद्य आणि रेड मीट सारखे पदार्थ हानिकारक असतात

 त्यामुळे हे पदार्थ टाळावेत,तसेच असे पदार्थ खावेत ज्याने किडनी डिटॉक्स करण्यास आणि हेल्दी राखण्यास मदत होईल

अमेरिकेच्या नॅशनल किडनी फाऊंडेशनच्या मते पाण्याशिवाय फळांचा रस देखील किडनी हेल्दी राखण्यास मदत करतो

 बाजारातील बॉटल बंद ज्यूस उपयोगी नाहीत.त्यात जास्त साखर आणि केमिकल असते.त्याने किडनीला नुकसान होते. घरीच फ्रेश ज्युस बनवा

 दूध कॅल्शियम आणि प्रोटीनचे चांगला स्रोत आहे.मजबूत हाडे आणि स्नायूंसाठी गरजेचे असते. किडनीचा आजार असेल त्यांनी दूध कमी प्यावे

अनेक प्लांट-बेस्ड दूधात डेअरीच्या दूधाच्या तुलनेत पॉटेशियम आणि फॉस्फरस कमी असते. त्यामुळे हे दूध किडनीसाठी चांगले असते

परंतू सर्वच प्लांट-बेस्ड मिल्क एकसारखे नसतात,काहीत साखर आणि काही तत्वे किडनीसाठी चांगली नसतात. म्हणून न्युट्रिशन लेबल वाचा आणि साखर तसेच फॉस्फरस नसलेले प्लांट-बेस्ड मिल्क निवडा

हार्वर्ड हेल्थ नुसार सायट्रेड कॅल्शियम सोबत मिळून किडनी स्टोन बनण्यास अटकाव करतो.त्यामुळे रोज अर्धा कप पाण्यात लिंबू रस टाकून प्या, त्याने लघवीत सायट्रेटचे प्रमाण वाढेल.किडनी स्टोनचा धोका कमी होईल

(  ही माहिती सर्व सामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांना भेटा )