IAS आणि IFS पैकी कुणाला मिळतो सर्वाधिक पगार?

21 मे 2025

Created By:  संजय पाटील

IAS म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा. ही केंद्र सरकारची प्रमुख प्रशासकीय नागरी सेवेपैकी एक आहे. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे 

आयएएस, आयपीएस आणि आयएफएस या 3 भारत सरकारच्या अखिल भारतीय सेवांच्या प्रशासकीय शाखा आहेत. 

आयएएस म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस म्हणजे भारतीय पोलीस सेवा तर आयएफएस म्हणजे भारतीय वन सेवा.

एका आयएएस अधिकाऱ्याला सुरुवातीला 56 हजार 100 रुपये वेतन मिळतं. त्यानंतर अनुभव आणि पदोन्नतीद्वारे हे वेतन 2 लाख 50 हजार पर्यंत वाढू शकतं

कॅबिनेट सचिव हे आयएएसमधील सर्वोच्च पद असतं. कॅबिनेट सचिव या पदासाठी मासिक 2 लाख 50 हजार रुपये वेतन मिळतं.

एका आयएफएस अधिकाऱ्याला सुरुवातीला 56 हजार 100 रुपये वेतन मिळतं.त्यानंतर वेतन अनुभव आणि प्रमोशननुसार वाढतं

वन महासंचालक हे  आयएफएस सेवेतील सर्वोच्च पद आहे. या सेवेतील सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्याला एका महिन्यासाठी 2 लाख 25 हजार वेतन मिळतं.

हातात कवड्यांचं ब्रेसलेट घातल्याने काय होतं? जाणून घ्या