टाचांमध्ये वेदना किंवा सूज हे कोणत्या आजाराचे लक्षण ?
27 June 2025
Created By : Manasi Mande
टाचांमधील वेदनांची समस्या अनेकांना जाणवते. चालताना किंवा उभं राहिल्यावर टाच दुखू लागते. हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
डॉ. दीपक सुमन यांच्या सांगण्यानुसार, हे सामान्य आहे. प्लांटर फेसिया टिश्यू असतो जो टाचेपासून पावलापर्यंत जोडलेला असतो. त्याल सूज आल्याने टाच दुखते.
बराच काळ उभं राहणं, चुकीच्या चपला वापरणं, जास्त वजन यामुळे हे होतं.
टाच मुरगळल्यामुळेही दुखू शकते. पटापट धावणं, सतत जिने चढणं यामुळे त्रास होतो.
बराच काळ टाचेवर जोर पडल्याने हाडांना हलका क्रॅक येऊ शकतो. ज्याल स्ट्रेस फ्रॅक्चर म्हणतात. जास्त चाल झाली किंवा धावलो की हे दुखणं वाढतं.
टाचदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर आराम करा, बर्फाने शेका, आरामदायी शूज घाला आणि हलकं स्ट्रेचिंग करा.
3-4 दिवसांपेक्षा जास्त काळ वेदना असतील, सूज वाढली तर डॉक्टरांना दाखवा आणि योग्य उपचार घ्या.
रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळी लाइन असते का ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा