जांभळाच्या बिया खाल्ल्याने काय फायदा मिळतो ?
18 June 2025
Created By : Manasi Mande
जांभळाच्या बिया खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, ए, जॅम्बोलिन,जॅम्बोसिन, गॅलिक ॲसिड, फ्लावोनॉइड्स, फायबर, टॅनिन्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्साडेंट मिळतं.
जांभळाच्या बियांमध्ये खूप पोषक तत्वं असतात. त्या खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे मिळतात.
डाएटिशियन परमजीत कौर यांच्या सांगण्यानुसार, जांभळाच्या बिया मधुमेहींसाठी गुणकारी असतात. त्यात जॅम्बोलिन,जॅम्बोसिन असतं जे साखर वेगाने वाढण्यास रोखतात.
जांभळाच्या बियांमध्ये असलेल्या तत्वांमुळे गॅसेस, अपचन यापासून आराम मिळतो. लूज मोशनही कमी होतं.
जांभळाच्या बिया या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
जांभळाच्या बियांमध्ये अँटीऑक्साडेंट आणि अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेचे संक्रमणापासून संरक्षण होतं, ती साफ राहते.
जांभळाच्या बियांच्या पावडरीमुळे मेटाबॉलिज्म वाढतं, कॅलरीज वेगाने जळतात आणि वजन कमी होतं.
डास नेमके का चावतात? कारण वाचून डोकं खाजवाल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा