या मुस्लीम देशाला म्हटले जाते टायरचे कब्रस्थान ?

18 February 2025

Created By: Atul Kamble

कुवैत देशाला टायरचे कब्रस्थान म्हटले जाते. जगातील सर्वात मोठे टायरचे डम्पिंग ग्राऊंड येथे आहे.

कुवैतच्या सुलायबिया शहरात हे टायरचे डम्पिंग ग्राऊंड आहे, म्हणून त्याला टायरचे स्मशान म्हणतात

हे डम्पिंगग्राऊंड इतके मोठे आहे की बेकार आणि वापरलेले टायर अंतराळातूनही दिसतात

अरब देशांच्या उत्तर पूर्वेला हे डम्पिंग ग्राऊंड आहे. विदेशातून आणलेले लाखो करोडो जुने टायर येथे डम्प केले जातात

एका जुन्या आकडेवारीनुसार ४२ दशलक्षाहून अधिक टायर येथे डम्प केले जातात

या जुन्या टायरना जाळल्याने येथे हवा विषारी बनते या डम्पिंगला लागलेल्या आगीचे व्हिडीओ व्हायरल झाले हो

 येथे काही वर्षांपूर्वी कुवैतने टायर रिसायक्लिंगचे काम देखील सुरु केले आहे. येथे शहर वसवले जात आहे

त्यामुळे येथील टायरना सौदी सीमेजवळील अल-सलामी नावाच्या ठिकाणी शिफ्ट केले जात आहे, तेथे जुन्यांपासून  नवे टायर तयार केले जातील

 टायरचे रिसायक्लिंग करणारी कंपनी EPSCO ग्लोबल जनरल ट्रेडिंगने अल-सलमीत एक प्लांट सुरु केला आहे.

अल-सलामी येथे टायरपासून नवी वस्तू बनवितात.तरी कुवैतचे टायर कमी झालेले नाहीत.