09 August 2025
Created By: Atul Kamble
नॅशनल आय इन्स्टिट्यूटने काही टिप्स दिल्या आहेत. ज्यांना फॉलो करुन डोळे निरोगी राहू शकतात
डोळे चांगले ठेवायचे असतील तर हिरव्या पालेभाज्या, उदा.पालक,केल,कोलार्ड ग्रीन खावे, सैल्मन, टुना मासे खावेत
स्वत:ला एक्टीव्ह ठेवा, डायबिटीज,हाय बीपी, हाय कोलेस्ट्रॉल सारखे आजार डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक असतात
सुर्याची अल्ट्रा व्हॉयलेट किरणे त्वचेलाच नव्हे तर डोळ्यांच्या आरोग्यासही नुकसान पोहचवतात,चांगल्या क्वॉलिटीचा सन ग्लासेस वापरा
स्क्रीन टाईम वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांना आराम द्यावा,दर २० मिनिटांनी २० फूट दूर असलेल्या वस्तूला २० सेंकद पाहा
डोळ्यांना वारंवार स्पर्श करु नका, कॉन्टॅक्ट लेन्स असतील तर लावताना वा काढताना हातांना स्वच्छ करत जा
स्मोकिंग, अल्कोहल यामुळे डोळ्यांसह आरोग्यावर परिणाम होत असतो.वाईट सवयींपासून दूर रहा