मंगळावर जीवन संभव, पुन्हा मिळाले पुरावे

5 जुलै 2025

Created By: बापू गायकवाड

3 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण होते असे पुरावे मिळाले आहेत

तसेच मंगळावरील एका डोंगरावर सक्रीय ज्वालामुखीही होता

हा ज्वालामुखी पृथ्वीवरील ज्वालामुखीसारखा होता

मंगळावर गेलेल्या पर्सिवेअरन्स या रोव्हरने ही माहिती शोधली आहे

3.7 दशलक्ष वर्षांपूर्वी मंगळावर एक तलाव होता अशीही माहिती समोर आली आहे

ज्वालामुखी आणि पाण्यामुळे या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता वाढली आहे

मंगळावरील खडकाचे नमुने पृथ्वीवर आल्यानंतर याबाबत अधिक माहिती समोर येणार आहे