मतदानाची संपूर्ण प्रोसेस घ्या जाणून

19 April 2024

Created By : Manasi Mande

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सुरूवात झाली आहे. जर तुम्हीही पहिल्यांदा मत देणार असाल तर मतदानाची प्रोसेस जाणून घ्या.

मतदान केंद्रावर गेल्यावर पहिले मतदारांच्या यादीत तुमचं नाव तपासलं जातं आणि त्यानंतर तुमचं ओळखपत्र / आयडीप्रूफ चेक केलं जातं.

त्यानंतर दुसरा कर्मचारी तुमच्या बोटावर शाई लावेल आणि एका रिसीट देईल. एका रजिस्टरवर ( फॉर्म 17 क) वर तुमची सही घेण्यात येईल.

तुम्हाला देण्यात आलेली रिसीट मतदान केंद्रातील कर्मचाऱ्याकडे जमा करावी लागेल व शाई लावलेले बोट दाखवावं लागेल. त्यानंतर तुम्ही मतदान बूथकडे जाऊ शकता.

बूथमध्ये गेल्यावर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) वर तुमच्या आवडत्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बॅलेट बटन दाबून मत द्यावे..

व्हीव्हीपॅट मशीनच्या विंडोवर तुम्हाला तुमच्या मताची रिसीट दिसेल. ती नीट तपासून घ्या.

उमेदवाराच्या क्रमांकाची संख्या, नाव आणि त्याचे निवडणूक चिन्ह असलेली ही रिसीट 7 सेकंद दिसेल. त्यानंतर ती सीलबंद व्हीव्हीपॅट बॉक्समध्ये पडेल.

तुम्हाला कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचं नसेल तर तुम्ही नोटा ( none of the above) हे बटण दाबू शकता. हे बटण ईव्हीएमवर सर्वात शेवटी असतं.