ही डाळ मानली जाते मांसाहारी, साधू - संत शिवतही नाहीत

18 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

डाळींना सर्वाधिक पोषक मानले जाते. अनेक डाळींमध्ये पोषक गुणधर्म असतात. मात्र एका डाळीला पुराणानुसार चक्क मांसाहारी डाळ म्हटले जाते.

मसूर डाळीला मांसाहारी डाळ म्हटले जाते. या डाळीत प्रोटीन देखील जास्त असते.मसूर डाळीला मांसाहारी मानण्यामागे काही धार्मिक मान्यता आहेत.

 एका पौराणिक कथेनुसार, राजा सहस्त्रबाहु आणि ऋषी जमदग्नी यांच्यातील संघर्षादरम्यान, कामधेनु गायीच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडले आणि त्यापासून मसूर डाळीचा उत्पन्न झाली अशी समजूत आहे.

 समुद्रमंथनावेळी भगवान विष्णूंनी स्वरभानु (राहु) राक्षसाचे मस्तक छाटले, तेव्हा त्याच्या रक्तापासून लाल मसूर डाळ निर्माण झाल्याची अख्यायिका आहे.

आयुर्वेदानुसार मसुर डाळीत तामसी गुण जास्त असतात. ही डाळ खाल्ल्याने शरीरात उष्णात, उत्तेजना आणि आळस वाढू शकतो. त्यामुळे पूर्वी ब्राह्मण आणि संन्याशी लोक ही डाळ खात नसत.