यूपीएससीमधील २०१५ मधील टॉपर टीना डाबी या देशभरात प्रसिद्ध आहेत. त्या राजस्थानमध्ये कार्यरत आहे.
17 July 2025
टीना डाबी यांची बहीण रिया डाबी आयएएस आहे. त्यांनी २०२० मध्ये १५ वी रँक घेतली होती.
टीना डाबी यांचे पती प्रदीप गवांडे आयएएस अधिकारी आहेत. रिया डाबी यांचे पती मनीष कुमार आयपीएस आहेत.
टीना डाबी आणि रिया डाबी यांची आई हिमाली यांनीही यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली होती.
हिमाली या इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसमधील अधिकारी होत्या. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधील टॉपर त्या होत्या.
टीना यांनी UPSC ची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिमाली यांनी असा निर्णय घेतला, ज्याचा कोणी विचार करणार नाही
हिमाली यांनी मुलीच्या यूपीएससीच्या तयारीसाठी त्यांना मदत करण्यासाठी आपली नोकरी सोडली. प्रत्येक पावलावर त्यांना मार्गदर्शन केले.
हिमाली यांनी टीनाची गरज समजून त्यांना मानसिक आणि भावनिक आधार दिला. परीक्षेची तयारी करताना कोणत्या चढ-उतारातून जावे लागते हे त्यांना माहीत होते, कारण त्या स्वतःही त्याच मार्गावरून गेल्या होत्या.