असं काय घडलं? मुंबईच्या हॉटेलात कस्टमर्सना का दिली जाते वेगवेगळ्या रंगाची स्लीपर?
7 March 2025
Created By : Manasi Mande
हॉटेलच्या रूममध्ये राहणारे लोक बऱ्याचदा चेकआऊट करताना टॉवेल, टूथपेस्ट, कंगवा, तेल , साबण सोबत घेऊन जातात. ( photos : Social Media)
काही लोक असही असतात जे हॉटेलच्या रूममधील बेडशीट, पांघरूण एवढंच नव्हे तर चपलाही चोरतात.
चप्पल चोरी मुळे वैतागून हे रोखण्यासाठी एका हॉटेलने अनोखी शक्कल लढवली. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरूये.
मुंबईतील या हॉटेलने तिथल्या गेस्टना वेगवेगळ्या रंगाच्या चपला दिल्या आहेत. त्यामुळे कोणी चप्पल चोरू शकणार नाही.
X वर एका युजरने पोस्टमध्ये स्लीपरचा फोटो शेअर केला. एक चप्पल हिरवी तर दुसरी ब्राऊनिश रंगाची आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. लोकांनी हॉटेल मालकाच्या युक्तीचे बरेच कौतुक केलं.
पण ज्यांना चोरी करायची आहे ते वेगवेगळ्या रंगाच्या चपलाही लांबवतील - असं एका युजरने लिहीलं.
असे घेतले हातात हात… सारा तेंडुलकरचे फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा