शरीरात व्हिटॅमिन B 12 ची महत्वाची भूमिका असते. अनेक अवयवांसाठी व्हिटॅमिन B 12 ची गरज असते.
24 February 2025
बी कॉम्पलेक्सचे हे व्हिटॅमिन डीएनए हेल्दी ठेवते, रेड ब्लड सेल तयार करते, नर्वस सिस्टमचा विकास करते.
व्हिटॅमिन B 12 कमी झाल्यावर स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे, अशक्तपणा, थकवा, चालणे आणि बोलण्यात डगमगणे यासारखी लक्षणे दिसतात.
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरता होण्यामागे पचन समस्या, चांगला आहार न घेणे ही करणे आहेत.
शाकाहारी लोकांनी व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूर करण्यासाठी डायटमध्ये रोज दुधाचा समावेश करणे गरजेचे आहे.
दुधात शतावरी जडीबुटीची पावडर मिसळून प्यायल्याने व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, त्यात बी12 देखील आहे.
दूध आणि शतावरी एकत्र सेवन केल्याने केवळ व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण होत नाही तर शरीराला अनेक पोषक तत्वे देखील मिळतात. त्यामुळे हाडे आणि स्नायू निरोगी ठेवण्यास मदत होते.
शतावरी आणि दूध एकत्र घेण्यापूर्वी आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आहारात बदल करू नयेत.