ATM मधून केवळ पैसेच काढता येतात असे नाही तर ही कामेही होतात...
13 June 2025
Created By: Atul Kamble
आपल्या डेबिट कार्ड आणि पिनचा वापर करुन आपण एटीएममधून पैसे काढतो, अन्य बँकाच्या एटीएममधून पैसे काढल्यानंतर जास्त शुल्क असते.
तुम्ही एटीएममधून खात्याचे बॅलन्स चेक करु शकता, गेल्या 10 देवाण-घेवाणीचे मिनी स्टेटमेंट काढू शकता
SBI एटीएमद्वारे तुम्ही एका कार्डातून दुसऱ्या कार्डवर पैसे ट्रान्सफरही करु शकता,प्रतिदिन ४० हजार रु.विना शुल्क ट्रान्सफर करता येतात
एटीएममधून क्रेडीटकार्डने सुद्धा रोकड काढता येते. परंतू त्यास उच्च शुल्क भरावे लागते.क्रेडिटकार्डचे देणीही भरु शकता
LIC,HDFC Life आणि SBI Life सारख्यांचे टायअप ज्या बँकांशी झालेय तेथे एटीएमने त्या विम्याचे प्रिमियम भरु शकता
जर आपले चेकबुक संपलंय तर बँकेच्या एटीएममधून चेकबुक घरपोच मागवू शकता
ज्या बँकांचे युटीलिटी कंपन्यांशी टायअप झालेय त्यांच्या बिलांचा भरणा एटीएमने करता येतो.
एटीएममधून व्यवहार करताना कार्डची जागा नीट तपासा,निर्जन वा नव्या ठिकाणी पैसे काढताना ही काळजी घ्या
या 9 सवयी आताच बदला अन्यथा व्हाल कंगाल, पैसा असा वाचवा