भारतच नव्हे तर या देशांचे राष्ट्रीय फूल देखील कमळच आहे
Created By: Atul Kamble
15 March 2026
कमळ भारताचे राष्ट्रीय फूल आहे.परंतू जगातील अन्य काही देशांनीही कमळाची निवड राष्ट्रीय फूल म्हणून केली आहे
भारतात कमळ राष्ट्रीय फुल आहे. कारण ते सत्य, ज्ञान आणि आध्यात्माचे प्रतिक आहे. धर्मशास्रानुसार लक्ष्मीचे आसन आहे.
व्हिएतनाम - व्हिएतनामचे देखील राष्ट्रीय फूल कमळच आहे. तेथे यास सौदर्य, शुद्धता आणि दृढतेचे प्रतिक मानतात.
इजिप्त - इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीत नाईल नदी निघालेले निळे कमल सूर्य आणि पुनर्जन्माचे प्रतिक आहे. आजही इजिप्तच्या कलेत त्याला स्थान आहे.
श्रीलंका - श्रीलंकेत निळे कमळ बौद्धधर्म आणि शुद्धता तसेच ज्ञानाचे प्रतिक मानले आहे.
बांगलादेश - या देशाचे राष्ट्रीय फूल, शापला ( वॉटर लिली ) आहे. जे कमळाच्या कुटुंबाचे सदस्य आहे. तेथील नदी, तलावात ते खूप आढळते.
मालदीव - मालदीवमध्ये पिंक लोटस राष्ट्रीय फुल आहे. शांतता आणि सौदर्याचे प्रतिक मानले जाते.
उन्हाळ्यात असा आहार करा आणि फिट राहा