अनेक वेळा तेल काढताना आपण वारंवार चमचा त्याच्यात टाकतो. त्यामुळे तेलात ओलावा येतो.

5 July 2025

अनेक जण कढाईत उरलेले गरम तेल परत बाटलीत टाकतात. यामुळे तेल लवकर खराब होते. तसेच त्याचे पौष्टिक मूल्य देखील कमी होते. 

सूर्यप्रकाश थेट तेलावर पडणार नाही, त्याची काळजी घ्या. प्रकाश आणि उन्हामुळे तेल ऑक्सीडाइज होते.तेल लहान बाटलीत साठवणे चांगले.

सूर्यप्रकाशामुळे तेलाची गुणवत्ता खराब होत असल्याने खिडकीजवळ तेल ठेऊ नये. गॅसजवळ तेल ठेऊ नये. कारण उष्णतेमुळे तेल लवकर खराब होऊ शकतो. 

तेल काचेच्या बाटलीत साठवणे चांगले आहे. शक्यतो गडद रंगाच्या बाटलीत तेल ठेवा. यामुळे तेलाचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते आणि त्याची गुणवत्ता टिकून राहते.

तेल कधीही उघडे ठेऊ नका. हवेच्या संपर्कात आल्यामुळे तेलात ऑक्सीडेशन होते. त्यामुळे तेलाची चव खराब होते. 

तेल खरेदी करताना त्याची निर्मिती आणि एक्सपायरी डेट तपासून घ्या. जुने किंवा कालबाह्य झालेले तेल वापरणे टाळा.