व्यक्तीच्या रोजच्या आहारात भाज्यांचा समावेश केलेला असतो. काही भाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

2 जून 2025

लहान मुले असो वा मोठ्या व्यक्ती भेंडीची भाजी सर्वांना आवडते. भेंडीची भाजी टेस्टी असण्यासोबतच ती खूप हेल्दी देखील आहे.

भेंडीपासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात. परंतु भेंडीचे पाणी पिणे खूप फायदेशीर आहे. 

भेंडीत व्हिटॅमिन बी, सी, फॉलिक ॲसिड, फायबर असतात. त्यामुळे भेंडीचे पाणी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

भेंडी फायबरचे समृद्ध स्त्रोत आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे अन्नातून कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करतात.

भेंडीमध्ये असलेल्या संयुगांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करता येते. यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका कमी होतो.

ताजी भेंडी चिरून रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ही भिजवलेली भेंडी पिळून घ्या. त्यानंतर स्लाइम पाण्यात मिसळून ते पाणी प्या.