13 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
पाणीपुरी ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. देशात कुठेही सहज मिळते.
भारतातील स्ट्रीट फूड आता अमेरिकेतही लोकप्रिय आहे. पण तिथे एका प्लेटची किंमत माहिती आहे का?
अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये पाणीपुरीचे स्टॉल आहेत. काही रेस्टॉरंट आणि दुकानांमध्येही पाणीपुरी मिळते.
तिथे राहणाऱ्या भारतीयांनी पाणीपुरीबाबत अनेक रिल्स तयार केले आहेत. त्यात एका प्लेटची किंमत शेअर केली आहे.
रिपोर्टनुसार एका पाणीपुरीची प्लेट 7 ते 10 डॉलर दरम्यान आहे. यात 6 ते 8 पाणीपुरी असतात.
अमेरिकन डॉलरची किंमत पाहता भारतात पाणीपुरीच्या एका प्लेटचे 600 ते 800 रुपये होतील.
पाणीपुरीचे पॅक देखील दुकानात मिळतात. यात 50 पाणीपुरी असतात. त्याची किंमत 5 डॉलर आहे.
जर तुम्ही दुकानातून पाणीपुरीचं पॅकेट विकत घेतलं तर तुम्हाला 400 रुपये खर्च करावे लागतील.