या घातक सवयी आजपासूनच सोडा अन्यथा किडनी होईल डॅमेज
Created By: Atul Kamble
23 FEB 2026
किडनी शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करते. ब्लड प्रेशर नियंत्रित करणे आणि आवश्यक मिनरल्सचे संतुलन करण्याचे कामही किडनी करते.
काही सवयींमुळे किडनीवर प्रेशर येते. किडनी स्टोन, क्रॉनिक किडनी डिसीज, युरिन इन्फेक्शन आणि किडनी फेल्युअर सारख्या त्यामुळे होऊ शकतात.चला तर पाहूयात कोणत्या सवयी घातक आहेत.
दिवसभर पुरेसे पाणी न पिल्याने शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात. त्यामुळे किडनीला जास्त मेहनत करावी लागते. दीर्घकाळ असेल केल्याने किडनी स्टोन आणि संक्रमणाचा धोका वाढतो.
जास्त मीठाचे पदार्ख खाल्याने बीपी वाढतो. हाय बीपीने किडनींच्या नसांना नुकसान होते. हळूहळू किडनीची क्षमता कमी होते आणि आजाराचा धोका वाढतो.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने वारंवार पेन किलर गोळ्यांचा वापर करणे ही घातक सवय आहे. ही औषधे किडनीच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. किडनीला आजारी पाडतात.
जास्त प्रोसेस्ड अन्न पदार्थ, तेलकट पदार्थ आणि गोड पदार्थांच्या सेवनाने लठ्ठपणा आणि डायबिटीजचा धोका वाढतो. या दोन्ही स्थिती किडनीवर अधिक दबाव आणतात.हळूहळू किडनी डिसिजला आमंत्रण मिळते.
दीर्घकाळ लघवी तुंबून ठेवण्याची सवय घातक ठरते. यामुळे बॅक्टेरियाचे संक्रमण वाढू शकते. वारंवार किडनी संक्रमण किडनीवर गंभीर परिणाम करु शकते.