सफरचंद खाल्ल्याने शरीरास कोणती जीवनसत्वे मिळतात ?

Created By: Atul Kamble

 22 FEB 2026

 रोज सफरचंद खाल्ल्याने शरीरास आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामुळे इम्युनिटी वाढते पचन चांगले होते. हृदयाचे आरोग्य चांगले रहाते. चला तर यात कोणते जीवनसत्व असते. ते पाहूयात.

 सफरचंदात व्हिटामिन्स सी आढळते. त्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. त्वचेच्या सेल्सचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.

सफरचंदाच व्हिटामिन्स A देखील असते.डोळ्याची दृष्टी त्यामुळे चांगली होते. नियमित सेवनाने शरीराचे हलके पोषण होते.

सफरचंदात व्हिटामिन्स K देखील असते. ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. रक्त घट्ट बनवण्यात मदत होते.

सफरचंदात B6 देखील असते. थायमिन आणि रायबोफ्लेविन सारख्या तत्वंही असते. त्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम चांगले होते. एनर्जी वाढते.

यात थोड्या प्रमाणात E व्हिटामिन्स देखील असते.तसेच एंटीऑक्सिडेंट तत्वेही असतात. ही शरीराला फ्री रेडिकल्स पासून वाचवतात. पेशींचे आरोग्यही नीट रहाते.

रोज एक सफरचंद खाल्ल्यास स्नॅक चांगला पौष्टीक होतो आणि सालीसकट ते खाल्ल्यास फायदा होतो.