लंडनच्या या कंपनीत राहुल गांधी होते नोकरीला ! 

4 May 2024

Created By : Atul Kamble

माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया यांचे राहुल गांधी पूत्र आहेत. साल 2004 पासून ते राजकारणात आहेत. 

राहुल गांधी यांचे शिक्षण दिल्लीतील मॉर्डन स्कूलमध्ये झाले. सुरक्षेमुळे त्यांना अनेकदा शिक्षण मध्येच सोडावे लागले. 

 दिल्लीनंतर डेहराडूनच्या डून शाळेत ते गेले. याच शाळेतून त्यांचे वडील राजीव शिकले होते. परंतू पुन्हा त्यांना शिक्षण सोडावे लागले.

आजी इंदिराजींच्या हत्येनंतर राहुल यांचे शिक्षण घरीच झाले. दिल्लीतील स्टीफन्स कॉलेजातील शिक्षणात खंड पडला

हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण अर्धवट सुटले. 1991 ते 94 पर्यंत रोलिंस कॉलेजातून आर्ट्समधून ग्रॅज्यूएशन केले.

राहुल यांनी 1995 केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रीनिटी कॉलेजातून एम. फिलची डीग्री घेतली. येथे ओळख लपवून शिक्षण घेतले.

लंडनच्या मॉनिटर ग्रुपमध्ये राहुल यांनी ओळख लपवून 3 वर्षे नोकरी केली आहे. मॅनेजमेंट गुरु मायकल पोर्टर यांची सल्लागार संस्था आहे.

राजीव यांची हत्या झाल्यानंतर राहुल फ्लोरीडाच्या रोलिन्स कॉलेजात गेले.1994 ला त्यांनी डिग्री घेतली.