1 जुलैपासून रेल्वेचे नवीन नियम लागू होणार आहे. या नियमामुळे तत्काळ तिकिटासाठी होणारी फसवणूक थांबणार आहे. 

29 June 2025

IRCTC App आणि वेबसाठी तत्काळ तिकीट बुकींगसाठी आधारचे प्रमाणीकरण करावे लागणार आहे. 

आयआरसीटीसी वेब आणि आयआरसीटीसी अॅप वापरून आधार प्रमाणित करणे खूप सोपे आहे. ही प्रक्रिया जाणून घ्या.

आयआरसीटीसी अ‍ॅप उघडल्यावर लॉगिन करा. यानंतर My Account वर जा. यानंतर ऑथेंटिकेट यूजर वर क्लिक करावे लागेल आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

IRCTC App स्मार्टफोन यूजर्ससाठी  iOS आणि Android मोबाइलवर उपलब्ध आहे. 

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी X वर आणखी एका नवीन नियमाची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, 15 जुलै 2025 नंतर OTP बेस्ड ऑथेंटिकेशन नियम लागू होणार आहे.

आरएस काउंटर आणि अधिकृत एजंट्सकडून तत्काळ तिकिटे बुक करण्यासाठी ओटीपी पडताळणी करावी लागेल. हे तत्काळ तिकिट बुकिंगमधील फसवणूक रोखण्यासाठी आहे.