भारतातील कोणत्या ट्रेनमध्ये ठेवले जातात नोटांनी भरलेले बॉक्स? 2016 मध्ये झाली होती मोठी चोरी

10 July 2025

Created By: Swati Vemul

जिओ हॉटस्टारवर 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ची (RBI) 5 भागांची डॉक्युमेंट्री प्रदर्शित

आरबीआयमध्ये काम कसं केलं जातं, नोटा आणि सोनं कुठे, कसे ठेवले जातात हे त्यात दाखवण्यात आलंय

यात एका खास ट्रेनचाही उल्लेख असून या ट्रेनच्या प्रत्येक डब्यात नोटांनी भरलेले बॉक्स असतात

याला ट्रेजरी ट्रेन किंवा करन्सी स्पेशल ट्रेन असंही म्हणतात

या ट्रेनद्वारे आरबीय नोटा छापल्यानंतर त्या देशाच्या विविध भागांमधील बँकांमध्ये पोहोचवते

ही प्रवासी ट्रेन नसून एका शहरातून दुसऱ्या शहरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सुरक्षितपणे नेण्यासाठी वापरली जाणारी विशेष ट्रेन आहे

रिझर्व्ह बँक या ट्रेनचा वापर विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये किंवा करन्सी चेस्टमध्ये रोख रक्कम पोहोचवण्यासाठी करते

या ट्रेनमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था, सशस्त्र रक्षक, पोलीस किंवा निमलष्करी दल तैनात असतात

ही ट्रेन फक्त आरबीआय आणि संबंधित सरकारी एजन्सींसाठीच आहे, त्याततून कोणताही प्रवासी प्रवास करू शकत नाही

2016 मध्ये या ट्रेनमध्ये मोठी चोरी झाली होती, तेव्हा काही चोरट्यांनी ट्रेनचं छप्पर तोडून 5.78 कोटी रुपये चोरले होते

या रोख रकमेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नऊ सदस्यांच्या पथकावर सोपवण्यात आली होती

हे सर्वजण शेजारच्या कोचमधून प्रवास करत होते, पण त्यांना दरोड्याची काहीच कल्पना नव्हती

एका आरबीआय अधिकाऱ्याने सांगितलं की, 340 कोटी रुपयांच्या फाटलेल्या जुन्या नोटा 226 बॉक्समध्ये सलेमहून चेन्नईला ट्रेनने पाठवल्या जात होत्या.

ट्रेन पोहोचल्यानंतर 226 बॉक्समधून नोटांनी भरलेल्या चार बॉक्ससोबत छेडछाड झाल्याची घटना समोर येताच आयजीपी एम. रामसुब्रमणी यांनी सांगितंल की, पाच कोटी रुपयांची चोरी झाली आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्रीला आला असा अनुभव