जगातला सर्वात छोटा देश जेथे रहातात केवळ 27 लोक

17 July 2025

Created By: Atul Kamble

तुम्हाला असा देश माहिती आहे का ज्याची एकूण लोकसंख्या अवघी 27 आहे

जर तुम्हाला माहीती नसले कर असा एक देश असून तो इंग्लंडजवळ स्थित आहे

या देशाचे नाव सीलँड आहे. हा देश इंग्लंडच्या सफोल्क समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे 10 किमीवर आहे.

सी लँड या चिमुकल्या देशाचे क्षेत्रफळ अवघं 550 चौरस मीटर आहे

सीलँडची निर्मिती दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान जर्मनीच्या हल्ल्याद्वारे वाचण्यासाठी इंग्रजांनी केली.

या देशाने 1967 मध्ये ब्रिटीश नागरिक पॅडी रॉय बेट्स यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची घोषणा केली.

सीलँडचे स्वतंत्र सरकार आहे. शाही कुटुंबाकडे परंपरात सत्ता चालत आली आहे. ज्याचे नेतृत्व सध्या पॅडी यांचे पुत्र मायकल बेट्स करत आहेत

 सीलँडची अधिकृत मुद्रा सीलँड डॉलर आहे.मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तिला मान्यता नाही. 

सीलँडला युकेसह कोणत्याही देशाने सार्वभौम देश म्हणून मान्यता दिलेली नाही.

सीलँडचा स्वत:चा ध्वज, राजधानी, पासपोर्ट आणि राष्ट्रीय चिन्हं आहेत.