कोणत्या अर्थमंत्र्याने संसदेत सर्वाधिक वेळा बजेट सादर केले पाहा

25 July 2025

Created By: Atul Kamble

निर्मला सितारमन यांनी २०२५ मध्ये लागोपाठ आठवे बजेट सादर केले आहे. कोणत्याही अर्थमंत्र्यांद्वारे सलग सादर केलेल्या बजेटचा हा विक्रम आहे. याआधी कोणत्याही अर्थ मंत्र्याने हे केले नाही

सितारमन या प्रथम २०१९ मध्ये अर्थमंत्री बनल्या.त्यांनी त्याच वर्षी २०१९-२० साठी आपले पहिले संपूर्ण बजेट सादर केले.त्याआधी त्यावर्षीचे अंतरिम बजेट पीयुष गोयल यांनी सादर केले होते

 २०२५ चे बजेट सितारमन यांचे आठवे आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे पहिले संपूर्ण बजेट होते.

वास्तविक सर्वाधिक बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावे आहे.त्यांनी एकूण १० वेळा केंद्रीय बजेट सादर केले

मोरारजी देसाई यांनी  वेग-वेगळ्या काळात केले आहे.१९५९ ते १९६३ लागोपाठ ५ पूर्ण बजेट आणि १अंतरिम, १९६७ ला एक आणखी अंतरिम आणि एक पूर्ण बजेट आणि नंतर १९६८,१९६९ मध्येही त्यांनी बजेट सादर केले

देसाई ११ वे बजेट सादर करु शकले असते परंतू इंदिरा गांधीच्या कॅबिनेटमधून त्यांनी १९६९मध्ये राजीनामा दिल्याने इंदिरा गांधी यांनी ते बजेट सादर केले

 पी.चिदंबरम यांनी एकूण ९ बजेट सादर केले,त्यांचा नंबर २ आहे. प्रणब मुखर्जी यांनी ८ वेळा बजेट सादर केले.निर्मला सितारमन त्यांच्या बरोबरीला आल्या आहेत.