25 April 2025

सापाचे कात टाकणे (जीवशास्त्रीय भाषेत मोल्टिंग किंवा एक्डीसिस) हा त्याच्या नैसर्गिक वाढीचा आणि शरीर निरोगी ठेवण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

25 April 2025

सापाचे शरीर त्वचेच्या आतील बाजूने वाढत असते. परंतु त्याची जुनी त्वचा (कात) लवचिक नसते. त्यामुळे शरीराला पुरेशी जागा मिळवण्यासाठी साप जुनी त्वचा टाकतो. ही सापाची शारीरिक गरज असते.

त्वचा खराब होते, सापाच्या त्वचेवर जंतू येतात किंवा माती साचते. कात टाकल्यावर सापाला नवी त्वचा मिळते.

कात टाकण्यापूर्वी सापाच्या त्वचेचा रंग फिक्कट होतो. त्याच्या डोळ्यांवर पांढरट किंवा निळसर आवरण तयार होते. त्यामुळे त्याची दृष्टी तात्पुरती कमी होते.

साप कात काढण्याची प्रक्रिया तोंडाजवळून सुरु करतो. तो त्वचेला एखाद्या खड्यात किंवा कठीण पृष्ठभागावर घासून बाहेर काढतो.

कात काढल्यावर सापाची ताकद वाढत नाही. फक्त वरची त्वचा गेल्यामुळे त्याचे शरीर लवचिक होते. त्याचे ताकद वाढण्याचा याबाबत कोणतेही कनेक्शन नाही. 

लहान साप असताना तो वेगाने वाढतो. त्यामुळे दर काही आठवड्यांनी तो कात टाकतो. परंतु प्रौढ साप वर्षातून २-३ वेळा कात टाकतो.