10 जुलै 2025
Created By: राकेश ठाकुर
उत्तर कोरिया नव्या रासायनिक शस्त्रांवर काम करत आहे. कोणत्याही युद्धात रासायनिक शस्त्रे ही धोकादायक मानली जातात. काही देशांनी याचा प्रयोग देखील केला आहे.
रशिया नोविचोक एजंट या रासायनिक शस्त्राचा वापर करत आहे. 2018 मध्ये सर्गेई स्क्रिपलवर आणि 2020 मध्ये एलेक्सी नॅव्हल्नीवर हल्ला झाला होता. यात काही मिनिटातच व्यक्तीचा मृत्यू होतो.
व्हिएक्स गॅस प्रयोग उत्तर कोरिया करते. किम जोंग उनने त्याचा नातेवाईक किम जोंग नामची हत्या 2017 मध्ये केली होती. सरीनपेक्षा 10 पट अधिक विषारी आहे.
1980 मध्ये इराक आणि इराणमधील युद्धादरम्यान इराकने याचा वापर केला होात. यामुळ श्वसन क्षमतेवर परिणाम होतो.
सोमन हे रासायनिक शस्त्र शीतयुद्धादरम्यान साठवले गेले होते. ते वापरलं नाही, पण संपर्कात आल्याने 15 मिनिटातच मृत्यू होतो.
सरीन जीबी 1995 मध्ये टोकियो मेट्रोवरील हल्ल्यात वापरल गेलं होतं. यात डझनभर लोकं मारली गेली होती. तसेच शेकडो लोकं आजारी पडले. यामुळे काही मिनिटात मृत्यू होऊ शकतो.
फॉस्जीन 1915 मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात फ्रान्स आणि जर्मनीने याचा वापर केला होता. यामुळे 85 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
क्लोरीन गॅसचा वापर पहिल्या महायुद्धात बेल्जियमच्या यप्रेसवर झाला होता. 2010 मध्ये सिरियाने याचा वापर केला होता. यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.
रिकीन रासायनिक शस्त्राचा वापर टार्गेट किलिंगमध्ये होते. 1978 मध्ये जॉर्जी मार्कोवच्या हत्येत याचा वापर झाला होता. यात श्वसन आणि पचनक्रिया फेल होते.
बीझेड या रासायनिक शस्त्राचा वापर अमेरिकेने वियतनाम युद्धात केला होता. यानंतर युगोस्लावने कोसोवो युद्धात वापरला होता. हे प्राणघातक नाही पण मानसिक भ्रम निर्माण करतो.
मस्टर्ड गॅसचा वापर पहिल्या महायुद्धात झाला. इराण इराक युदध आणि सिरियात आयएसने याचा प्रयोग केला होता. यामुळे त्वचा जळते आणि माणून दृष्टीहीन होतो.