भारताच्या या शेजारील देशाला म्हणतात  'हिंदसागरातील मोती', कोणता तो देश

29 November 2025

Created By: Atul Kamble

भारता शेजारील अनेक देश वैशिष्टयपूर्ण आहेत. परंतू एका देशाला हिंद महासागरातील मोती म्हणतात.

भारताचा शेजारील श्रीलंकेला हिंद महासागरातील मोती म्हटले जाते. यास हे नाव मिळण्यामागे अनेक कारणं आहेत.

 श्रीलंकेतील हिरवे जंगल,चहाचे मळे,धबधबे, डोंगर आणि वन्यजीव या समृद्धीमुळे मोती म्हटले असावे

 श्रीलंका हा सर्वात जुन्या मानवी संस्कृतीचा गड असल्यानेही त्यास अशी उपाधी मिळाली असावी

प्राचीन काळापासून हिंद महासागरातील समुद्री व्यापाराचा हा मार्ग होता. अरब,चीन आणि युरोपातील व्यापारी येथे थांबायचे.यासाठी देखील यास मोती म्हटले जात असावे.

येथील नीलम,टोपाज आणि रुबी सारखी रत्ने जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या समुद्री देशाला प्रतिकात्मक म्हणून मोती म्हटले असावे

 श्रीलंकेचे सॅटेलाईट फोटो पाहिले तर तो गोल आणि चमकत्या मोती सारखा दिसतो. हिंद महासागरातील मोती वाटतो.