पऱ्यांचा देश....उत्तराखंडातील या भागाचं काय रहस्य

26 June 2025

Created By: Atul Kamble

उत्तराखंडात अशा अनेक जागा आणि मंदिरं आहेत ज्या रहस्यांनी भरलेल्या आहेत.

उत्तराखंडाचे दुसरे नाव देवभूमी आहे.येथे देवी-देवतांचा वास आहे. यामुळे यास देवभूमी म्हणतात

उत्तराखंडातील टिहरी गढवाल येथे खैट पर्वत असून असे म्हणतात येथे ९ पऱ्या राहातात. यामुळे याला पऱ्यांचा देश म्हणतात

गढवालमध्ये पऱ्यांना आंछरी देखील म्हणतात.यांच्या संबंधित अनेक कहाण्या आणि किस्से आहेत.

 या पऱ्या गावांचे संरक्षण करतात. त्यामुळे त्यांची पूजा केली जाते. असे म्हणतात या पऱ्या कोणत्याही रुपात दर्शन देतात

खैट पर्वतावर खैटवाल मंदिर असून ते पऱ्यांचे मंदिर म्हटले जाते.

हे मंदिर चमत्कारी शक्तींचे केंद्र म्हटले जाते. स्थानिक लोक यांना आपली कुलदेवी मानून पूजतात

या पऱ्यांना चमकदार आणि भडक रंग आणि गोंधळ अजिबात आवडत नाही असेही म्हटले जाते.