ऊंटाचे अश्रू २६ प्रकारच्या सापाच्या विषावर उतारा ठरु शकते असे म्हणतात.
31 डिसेंबरला रात्री 12 वाजता जगातला हा भाग सर्वात आधी नव्या वर्षात दाखल होतो.
प्रशांत महासागरातील हे छोटेसे बेट किरिबाती जगात सर्वात आधी नवे वर्षे साजरे करतो. 2026 चे स्वागत आधी येथे होईल.
किरिबातीचा किरितिमाती ( ख्रिसमस आयलँड ) सर्वात पूर्वेला आहे.इंटरनॅशनल डेट लाईनच्या जवळ असल्याने येथे सुर्य सर्वात आधी उगवतो आणि नवे वर्षे आधी सुरु होते.
किरिबाती UTC+14 टाईम झोनमध्ये आहे. हा जगात सर्वात पुढचा टाईम झोन आहे. भारतात जेव्हा सायंकाळी 6.30 वाजतील तेव्हा, तेथे नवे वर्षे सुरु झाले असेल.
1995 मध्ये किरिबातीने इंटरनॅशनल डेट लाईनला स्वत:च्या फेव्हरमध्ये शिफ्ट केले. त्यामुळे संपूर्ण देश एक दिवसात रहातो आणि किरितिमाती सर्वात आधी नवे वर्षे साजरे करते.
किरिबातीनंतर चैथम आयलँड (न्यूझीलंड )आणि नंतर ऑकलँड येथे नवे वर्ष सुरु होते. परंतू किरिबातीचा नंबर नेहमीच पहिला असतो.
किरिबातीच्या छोट्या बेटांवर चर्चमध्ये प्रार्थना, पारंपारिक डान्स,फॅमिली गॅदरिंग आणि समुद्र किनारी आतिषबाजी करुन नवे वर्षे साजरे केले जाते.साधेपणाने परंतू आनंदाने नवे वर्षे साजरे केले जाते.
भारताचा UTC+5.30 आहे. किरिबातीच्या UTC+14 असल्याने तो भारताच्या 8 तास 30 मिनिटे पुढे आहे. भारतात 31 डिसेंबरला सायंकाळ असेल तर तेथे 1 जानेवारीची सकाळ झालेली असते.
सर्वात शेवटी नवे वर्ष अमेरिकन सामोआ आणि बेकर आयलँडमध्ये सुरु होते.येथे किरिबातीच्या 26 तासांनंतर नव्या वर्षांची सुरुवात होते.
31 डिसेंबर 2025 च्या मध्यरात्री किरितिमाती बेटावर सर्वात आधी 'Happy New Year 2026' म्हटले जाईल.तेथे सुर्य उगताच नवे वर्षे सुरु होईल.