16 ऑक्टोबर 2026
Created By: Bhakti Gothankar
जगात असाही एक फुल आहे ज्याचा वास घेतल्यावर तुम्हाला सुगंध ऐवजी कुंजलेल्या मासांची आठवण येईल विशेष म्हणजे या फुलाचा विचित्र वास म्हणजे निसर्गाची कीटकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट युक्ती आहे
या फुलाला कॉर्प्स फ्लावर (Titan arum) असं म्हणतात. वैज्ञानिक नाव Amorphophallus titanum हे फुल इंडोनेशियातील सुमात्रा बेटाच्या उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळत. त्याचा प्रचंड आकार आणि कुजलेल्या मांसासारख्या वासामुळे ते जगभरात प्रसिद्ध आहे
सामान्य फुलांचा सुगंध मन प्रसन्न करतो पण या फुलाच्या बाबतीत चित्र अगदी उलट आहे हे फुल उमलताना त्यातून कुजलेल्या मासांसारखा उग्र वास बाहेर पडतो. याच्या पाकळ्यांमध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ असतात. त्यामुळे या फुलाला कुजलेल्या प्राण्याच्या शरीरासारखा वास येतो.
या फुलाला स्वतःचं परागीभवन होण्यासाठी कीटकांची मदत लागते. या वासाम ळे माशा आणि इतर कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात. त्या कीटकांच्या माध्यमातून पराग कण एका फुलापासून दुसरा फुलापर्यंत पोहोचवण्यास मदत होते.
हे फुल मोठ्या आकारासाठी ही ओळखलं जातं. हे फूल 3 मीटर पर्यंत उंच वाढू शकतो त्याच्या मध्यभागी उंच दांड्या सारख्या भाग असतो आणि त्या भोवती मोठं गडद रंगाचं आवरण असतं त्यामुळे हे फुल उमलल्यावर एखाद्या अनोख्या वनस्पती सारखे दिसतात
हे दुर्मिळ फुल सुमात्राच्या जंगलांमध्ये आढळणारे एक विशेष फुल आहे. जंगलतोड आणि नैसर्गिक अधिवासाचे नुकसान यांचा त्या कारणांमुळे त्या वनस्पतीचे नाश होत आहे.
निसर्गाशी भन्नाट युक्ती आपल्याला एखादी गोष्ट दुर्गंधी युक्त वाटली तरी निसर्गात त्याचा वेगळाच उपयोग असू शकतो कॉर्प्स फ्लावर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे...