या देशात नाहीये एकही मशीद, मग रमजानमध्ये नमाज कशी पढतात?

7 March 2025

Created By : Manasi Mande

इस्लाममधील पवित्र महिना रमजान सुरू झाला आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा ठेवतात, नमाज पठण करतात

रमजानच्या काळात मशिदीत पाच वेळा नमाज आणि तरावीहची नमाज अदा करतात

पण एक देश असा आहे, जिथे मुस्लिम आहेत, पण देशात मशीदच नाही

भूतान हा तो देश. त्याची लोकसंख्या साडे सात लाख आहे, त्यात 7 हजार मुस्लिम आहेत

भूतानमध्ये 75 टक्के बौद्ध आहेत, तर 22 टक्के हिंदू आहेत

भूतानमध्ये सर्वाधिक बौद्ध विहार आहेत, पण एकही मशीद नाही

त्यामुळे मुस्लिम बांधव घरातच नमाज पठण करत असतात