भारताच्या या प्रसिद्ध व्यक्तींचा विमान अपघातात झाला होता मृत्यू
19 June 2025
Created By: Atul Kamble
अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले.याआधीही भारताच्या अनेक हस्तींचे विमान अपघातात निधन झाले आहे
एअर इंडियाचे विमान स्विस आल्प्स पर्वतात कोसळून अणूशास्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचा २४ जानेवारी १९९९ रोजी मृत्यू झाला होता
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा थोरला मुलगा संजय गांधी यांचा १९८० साली विमान चालवताना अपघाती मृत्यू झाला
ज्योतिरादित्य सिंधीया यांचे वडील काँग्रेस नेते माधवराव सिंधीया यांचा ३० सप्टेंबर २००१ रोजी युपीतील मैनपुरी येथे विमान कोसळून मृत्यू झाला
लोकसभेचे अध्यक्ष आणि टीडीपी नेते जीएमसी बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी आंध्रात हॅलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला
मेघालयाचे ग्रामविकासमंत्री साईप्रियन संगमा गुवाहाटीहून शिलाँगला जाताना हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला
दक्षिण भारतीय अभिनेत्री के.एस.सौम्या यांचा १७ एप्रिल २००४ रोजी हवाई दुर्घटनेत मृत्यू झाला.
उद्योगपती आणि हरियाणाचे मंत्री प्रकाश जिंदल यांचा २००५ मध्ये उत्तर प्रदेशच्या सहारनपुर येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला
आंध्रचे तत्कालिन मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा २ सप्टेंबर २००९ रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला
अरुणाचलचे तत्कालिन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचा ३० एप्रिल २०११ रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
भारताचे पहिले संरक्षण प्रमुख ( CDS ) जनरल बिपिन रावत यांचा ८ डिसेंबर २०२१ रोजी तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला
12 महिन्यानंतर शुक्र ग्रहाचा त्रिकोणी राजयोग,या राशींचे भाग्य चमकणार