टुथपेस्टने झटपट साफ होतील  घरातल्या या वस्तू

Created By: Atul Kamble

 3 feb 2026

टुथपेस्ट दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. मात्र त्याच्या वापर करुन घरातल्या वस्तूही स्वच्छ होतात.

 भिंतीवर क्रेऑन आणि मार्करचे डाग असतील तर आधी ओल्याफडक्याने पुसा, नंतर पेस्ट लावा, नंतर पुन्हा ओल्या फडक्याने स्वच्छ करा

घरात जर तांब्याची भांडी असतील तर पेस्टमध्ये थोडा बेकींग सोडा मिक्स करुन टुथब्रशने भांडे घासा,स्वच्छ होईल

शॉवर डोअर,काचांना डाग असतील तर टुथपेस्ट लावा,ओल्या फडक्याने स्वच्छ करा.काचा चमकू लागतील.

चांदीचे दागिने काळे पडले असतील तर टुथपेस्टने चमकू शकतात.पेस्ट आणि कोमट पाण्याने चांदीची भांडीही स्वच्छ होतात.

रबरची वस्तू, स्विच बोर्ड, सिरेमिक कप अशा पांढऱ्या वस्तूंना डाग असतील तर टुथपेस्टने त्या चकाचक करता येतात.

 स्टीलचे नळ, किंवा क्रोमियम प्लेटेड वस्तू , सिंक आदींना डाग पडले असतील तर टुथपेस्टने स्वच्छ होतात.