या वस्तू फ्रिजमध्ये कधीच ठेवू नयेत

5 september 2025

Created By: Atul Kamble

अंड्यांना फ्रिजमध्ये ठेवू नये,त्यामुळे त्याच्यातील ओलावा कमी होऊन चव जाते.त्यामुळे अंडी कोरड्या जागी ठेवावीत

 लोणचं देखील फ्रिजमध्ये ठेवू नये,त्यातील तेल,मीठ-मसाले फ्रिजमध्ये गोठून त्यांची चव बिघडते.

कांदे फ्रिजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होतात. कांदे मोकळ्या जागी जाळीदार टोपलीत ठेवावेत

 लसूण देखील फ्रिजमध्ये ठेवायची काही गरज नाही. फ्रिजमध्ये त्याला कोंब येऊ शकतात. त्याऐवजी कांद्यासारखे तेही बाहेरच ठेवावेत

 मधाला फ्रिजमध्ये ठेवल्याने त्याची चव आणि गुणवत्ता दोन्ही खराब होते.मध रुम टेम्पेचरला ठेवावा

ब्रेडला देखील फ्रिजमध्ये ठेवू नये.त्यामुळे ब्रेड कडक होऊ शकतो.चव बिघडू शकते. तो त्याच्या एअरटाईट पिशवीत ठेवावा.

 फ्रिजमध्ये टोमॅटो ठेवल्याने तो लवकर खराब होतो.त्यामुळे त्याला ही जाळीदार टोपलीत ठेवावे