पाणी नाही बदलले तरी हे शोभीवंत मासे फिश टँकमध्ये आरामात जगतात, पाहा कोणते?

27 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

कमी देखभालीत जगणारे प्रमुख शोभीवंत मासे घरात फिश टँकची शोभा वाढवतात. त्यामुळे टँकचे पाणी वारंवार बदलण्याची गरज नसते.

बेटा फिश  माशात 'लॅबिरिंथ ऑर्गन' नावाचा एक खास अवयव असतो. यामुळे ते पाण्यातील ऑक्सिजन कमी झाला तरी थेट पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवेतून श्वास घेऊ शकतात.

गप्पी मासे अत्यंत काटक असतात. पाण्याचे तापमान किंवा पीएच पातळीत थोडा बदल झाला तरी ते सहज जुळवून घेतात.

झेब्रा डॅनिओ हे अतिशय चपळ आणि मजबूत मासे आहेत. नवीन फिश टँक सेट करताना पाण्याच्या बदलत्या परिस्थितीशी ते सहज जुळवून घेत असतात.

 चेरी बार्ब हे शांत स्वभावाचे परंतू दिसायला अतिशय सुंदर मासे पाण्यातील छोट्या बदलांना सहज तोंड देऊ शकतात.

ब्लॅक स्कर्ट टेट्रा हे मासे कळपाने राहतात आणि फिल्टर किंवा पाणी अस्वच्छ झाले असेल तरी लवकर आजारी पडत नाहीत.

जर तुम्ही टँकचे पाणी बदलण्याचा कालावधी वाढवणार असाल, तर टँकमध्ये जिवंत पाणवनस्पती लावा.

या वनस्पती माशांच्या विष्ठेतून तयार होणारे विषारी घटक अमोनिया आणि नायट्रेट्स शोषून घेतात आणि पाणी नैसर्गिकरीत्या स्वच्छ करतात.