WhatsApp Web ची ही चुक महागात पडेल, हॅकर्स तुमची प्रायव्हेट चॅट वाचतील

26 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

जर तुम्ही ऑफीस वा कोणाच्या कॉम्प्युटरवर  WhatsApp Web चालवत असाल तर काम केल्यानंतर लॉगआऊट करणे विसरु नका, म्हणजे तुमची प्रायव्हेट चार्ट दुसरे लोक वाचू शकणार नाही.

तुम्हाला वाटत असेल की ब्राऊजर बंद केल्याने WhatsApp Web बंद होते. तर असे नाही. अनेकदा  WhatsApp Web अकाउंट कंप्यूटर ओपन रहाते.

WhatsApp Web वर QR कोड स्कॅन करुन अकाऊंट लिंक होतात. अशा वेळी अनोळखी   QR कोड स्कॅन करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते.

जर तुमचा WhatsApp कोणा दुसऱ्या कंप्यूटरवर उघडले गेले आहे, तर कोणीही तुमची पर्सनल चॅट, फोटो, व्हिडियो आणि ग्रुप मॅसेज पाहू शकतात.

हॅकर्सला तुमच्या WhatsApp चा एक्सेस मिळाला तर तुमच्या नावाने तो तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना मॅसेज पाठवू शकतो. आणि पैशांची मागणी देखील करु शकतो.

तुमच्या WhatsApp अकाऊंटचा चुकीचा वापर करुन साइबर गुन्हेगार इतरांना फर्जी लिंक पाठवू शकतो. यामुळे तुम्हाला ओळखणारे लोक या ऑनलाईन फसवणूकीचे शिकार होऊ शकतात.  

 सायबर कॅफे वा पब्लिक कॉम्प्यूटरवर WhatsApp Web उघडणे नाईलाज असेल तर Incognito मोडचा वापर करा. परंतू यालाही संपूर्ण सुरक्षित मानू नये.

 WhatsApp आणि आपल्या ब्राऊजरला नेहमीच अपडेट ठेवा. अनोळखी वेबसाईटवरुन कोणतीही फाईल डाऊनलोड करु नका. संशयित लिंकवर क्लिक करु नका.

जर तुमचा WhatsApp कोणा दूसऱ्या  डिव्हाईसमध्ये चालत तर नाही ना ? फोनमध्ये  Linked Devices ऑप्शन उघडा. आणि कोणताही अनोळखी डिव्हाईस दिसला तर त्यास लागलीच त्याला लागलीच  Log Out करा.