गुळवेल, गुडुची- गिलोय वनस्पती एकच, फायदे अपरंपार, हे आजार कायमचे पळतील...

26 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

 गिलोय म्हणजेच मराठीत ज्याला गुळवेल म्हणतात. आयुर्वेदात ही वनस्पती संजीवनी सारखी आहे. त्याच्या पोषकघटकाने मोठे मोठे रोग दूर पळतात.

गुळवेलीच्या सेवनाने शरीर निरोगी राहाते. ही वनस्पतीच्या कांड्यांचा फायदा खूप होतो.चला तर जाणून घेऊयात..

गिलोयमध्ये कॅल्शियम, फॉस्परस, आयर्न,तांबे ( कॉपर),मॅगनीझ, झिंक,व्हिटामिन्स सी,बीटा-कॅरोटीन, प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट,फॅट, एंटी-ऑक्सीडंट त्वत आणि एंटी-इंफ्लेमेटरी सारखे पोषक तत्वे असतात.

 रक्ताची ज्यांना कमतरता असेल त्यांनी गिलोयचे सेवन रोज करावे. त्याने शरीरातील लोहाची ( आयर्न ) कमतरता दूर होते.

थंडीत नेहमी आपली इम्युनिटी विक होते. अशावळी रोज गिलोयची कांडी चघळावी, त्यात व्हिटामिन्स सी असते.

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गिलोयचे फायबर कामी येईल. काही दिवसात हा त्रास दूर होईल.

गिलोयमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. रोज गिलोयचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.

 गिलोयचे प्रमाण आयुर्वेदाचार्यकडून समजून ते नीट आणि योग्य प्रमाणात सेवन करावे.