उलट्या दिशेने वाहतात देशाच्या  या नद्या, पाहा कोणत्या ?

20 November 2025

Created By: Atul Kamble

भारतात अनेक नद्या आहेत. परंतू त्यातील गंगा, यमुना आणि नर्मदा यासारख्या नद्या प्रमुख आहेत.

 देशाच्या बहुतांश नद्या या पूर्व दिशेने वाहून बंगालच्या खाडीला जाऊन मिळतात.परंतू तीन नद्या अशा आहेत ज्या याच्या उलट्या दिशेने वाहतात.

विशेष म्हणजे या तीन नद्याचा उगम स्थान मध्य प्रदेशात आहे.एकीला तर रिव्हर्स-फ्लोईंग नदी देखील म्हणतात.

उलट्या दिशेने वाहणाऱ्या नदीत पहिले नाव नर्मदा नदीचे आहे. नर्मदा नदीला रेवा देखील म्हटले जाते.

 नर्मदा नदी मध्यप्रदेशाच्या अमरकंटक येथील मैखल पर्वतातून उगम पावून पूर्वेकडून पश्चिमेला वाहते आणि गुजरातला जाऊन अरबी समुद्राला मिळते.

नर्मदा उलट्या दिशेने वाहणारी सर्वात लांब नदी असून तिला भारताची रिव्हर्स-फ्लोईंग नदी देखील म्हणतात

नर्मदा नदीचा उलटा प्रवास रिफ्ट व्हॅलीमुळे होतो. येथे जमीन पश्मिमेकडे सरकती आहे. त्यामुळे नदी देखील पश्चिम दिशेने वाहते.

मध्य प्रदेशातील उलट्या दिशेने वाहणाऱ्या नदीत ताप्ती नदी देखील सामील आहे. ताप्ती नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याच्या मुलताई तहसील येथील नादर कुंडातून होता. 

 ताप्ती नदी देखील नर्मदा सारखी पूर्व ते पश्चिम अशी वाहते आणि खंभातच्या खाडीत जाऊन समुद्राला मिळते. 

चंबल नदीचा प्रवाह भारताच्या अन्य नद्यांपेक्षा भिन्न आहे. ही नदी दक्षिणेकडून उत्तर दिशेला वाहते.