या शाकाहारी पदार्थात असते  ओमेगा - 3 फॅटी एसिड

20 october 2025

Created By: Atul Kamble

प्रोटीन, फायबर,पोटेशियम, मॅग्नेशियम आणि इतर सर्व विटामिन्ससारखे ओमेगा - 3 फॅटी एसिड देखील शरीरासाठी आवश्यक असते.

अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे कन्सलटन्ट जनरल फिजीशियन डॉक्टर अंकित पटेल यांच्या मते ओमेगा-3 फॅटी एसिड एक आवश्यक पोषक तत्व आहे. जे शरीर स्वत:तयार करु शकत नाही. आपल्या ते काही पदार्थांतून मिळवावे लागते. 

शरीरात ओमेगा-3 फॅटी एसिडची कमी झाल्यानंतर विस्मरण होणे,चिडचिणेपणा, ड्रायनेस, मूड खराब होणे आणि त्वचेशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात.

या शिवाय याच्या कमतरतेने डोळ्यांची दृष्टी कमजोर होणे,हृदयाशी संबंधित समस्या, यासाठी शरीरात याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. 

ओमेगा-3 फॅटी एसिड  ALA,EPA आणि DHA अशा तीन प्रकारचे असतात. आळशीच्या बिया, चिया सीड्स, सोयाबिन, कनोला ऑईल,अक्रोड, आणि हिरव्या पालेभाज्यात ते भरपूर असते.

डेअरी प्रोडक्ट - अंडी तसेच काही डेअरी प्रोडक्टमध्ये हे थोड्या प्रमाणात असते. तज्ज्ञांशी बोलून यासंदर्भात माहिती घेऊ शकता.